रतलाम : रतलाम जिल्ह्यातील जावरा येथे आज एका नववधूचा गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना घडली. हत्येनंतर मारेकरी पसार झाला आहे.नववधू मेकअप करण्यासाठी ब्यूटी पार्लरमध्ये आली होती.
दरम्यान एका हल्लेखोराने ब्यूटी पार्लरमध्ये प्रवेश करत धारदार शस्त्राने तिचा गळा चिरला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नववधूला तातडीने नजीकच्या जावरा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
एकतर्फी प्रेमातून ही हत्या करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.सोनू कमल सिंह यादव (32) असं मृत नववधूचे नाव आहे. शाजापूर येथील रहिवासी सोनू कमल सिंह यादव हिचा विवाह नागदा येथील गौरव सोबत आज (रविवारी) होणार होता. कोठारी रिसोर्टमध्ये तिच्या विवाहाची सर्व तयारी झाली होती.
नववधू सोनू सकाळीच आपल्या नातेवाईकांसोबत शाजापूर येथून जावरा येथे आली होती. विवाह पूर्वी सोनू मेकअप करण्यासाठी येथील आंटिया चौकातील ब्यूटी पार्लरमध्ये आली होती. त्याच वेळी अज्ञात हल्लेखोराने सोनूचा गळा चिरुन तिची हत्या केली. जावरा पोलीस पुढील तपास करत आहेत.