नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आज केंद्रीय कॅबीनेटची एक बैठक झाली. या बैठकीत नवी राष्ट्रीयकृत बॅंक स्थापन करण्याचा निर्णय झाला. विकास वित्त संस्था या नावाने ही बॅंक असेल. ही बॅंक बड्या प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करुन देणार आहे. नव्या संस्थेसाठी एका बोर्डाची स्थापना केली जाणार आहे. सरकारकडून या बॅंकेला सुरुवातीला 20 हजार कोटी रुपयांचा निधी देणार आहे.
सर्वच सरकारी बॅंकाचे खासगीकरण केले जाणार नसल्याचे अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी स्पष्ट केले आहे. देशात एसबीआय सारख्या बॅंका व्हाव्यात अशी आमची इच्छा असल्याचे देखील खासगीकरणाच्या मुद्द्यावर बोलतांना अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे. या बँकेकडून बाँड जारी करण्यात येऊन त्या माध्यमातून निधी तयार केला जाईल. पुढील काही वर्षात 3 लाख कोटी रुपये उभे करण्याची अपेक्षा अर्थमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. या गुंतवणूकीत कर सवलत मिळणार आहे.