ती मर्सिडीज कार धुळे पासिंगची

On: March 16, 2021 10:40 PM

मुंबई : मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी एनआयएने जप्त केलेल्या मर्सिडीज कारबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. एनआयएने जप्त केलेली ती मर्सिडीज कार धुळे पासींगची असून तशी माहिती कारचे जुने मालक व धुळे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाची पाळेमुळे धुळ्याशी संबंधित तर नाही या चर्चेला सुरुवात झाली आहे.

मनसुख हिरेन यांनी ज्या मर्सिडीज कारने शेवटचा प्रवास केला ती मर्सिडीज कार धुळे पासींगची असल्याचे समोर आले आहे. सदर कार सारांश भावसार यांची होती. याप्रकरणी सारांश भावसार याबाबत माहिती देणार आहेत. सारांश भावसार यांनी ती कार फेब्रुवारी महिन्यात विक्री केली होती. त्याची कागदपत्रे भावसार यांच्याकडे असल्याचे म्हटले जात आहे. मात्र या प्रकरणाशी आपला काही संबंध नसल्याचे सारांश भावसार यांनी म्हटले आहे. ही मर्सिडीज कार स.पो.नि. सचिन वाझे वापरत असल्याचे देखील म्हटले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment