दीर-भावजयीच्या महामार्गावरील गोंधळाचा व्हिडीओ व्हायरल

On: March 17, 2021 12:59 PM

धुळे : मद्यधुंद अवस्थेतील दिर व भावजयीने 14 मार्च रोजी सायंकाळी साडे सहा वाजता मुंबई – आग्रा महामार्गावर गोंधळ घातला होता. गस्तीवरील पोलिसांसोबत मद्यधुंद अवस्थेतील महिलेने धक्काबुक्की केल्याचा प्रकार रविवारी घडला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

या घटनेतील मद्यधुंद अवस्थेतील महिला व पुरुष हे नात्याने दिर व भावजय असल्याचे समजते. या घटनेत दोघांना हटकणा-या पोलिसांनाच महिलेने धक्काबुक्की केल्याचा चुकीचा प्रकार धुळे जिल्ह्यातील मुंबई आग्रा महामार्गावर नरडाणा जुन्या टोलनाक्यानजीक घडला. जवळपास तासभर हा प्रकार सुरु होता. या प्रकरणी दोघांविरुद्ध नरडाणा पोलिस स्टेशनला विविध कलमांतर्गत रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्यकीय तपासणीअंती दोघांनी मद्य प्राशन केल्याचे उघड झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment