मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर स्फोटकाने भरलेले वाहन आणि मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यु या दोन घटनांनी पोलिस दलासह राजकारणात विविध घडामोडी झाल्या आहेत. या घटनेतील संशयाच्या आणि वादाच्या भोव-यात सापडलेले स.पो.नि. सचिन वाझे सध्या 25 मार्च पर्यंत एनआयएच्या कोठडीत आहेत.
आता मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली केली जाणार असल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करुन दिली आहे. आता मुंबईचे नवे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे होणार असून रजनीश शेठ यांच्याकडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार तसेच संजय पांडे यांच्या कडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जवाबदारी दिली जाणार आहे. परमबीर सिंह यांच्या कडे होमगार्डची जबाबदारी दिली जाणार असल्याचे ट्वीट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.