मुंबई : अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर देखील जिल्हा न्यायालयात का गेले नाही अशा शब्दात बिएचआर प्रकरणी आरोप असलेल्या सुनिल झवर याचा जामीन अर्ज मागे घेण्यास उच्च न्यायालयाने बजावले. जामीन अर्ज मागे घ्या नाहीतर आदेश करावा लागेल अशा शब्दात उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर सुनिल झवर यांच्या वकीलांनी जामीन अर्ज मागे घेतला. त्यानंतर सुनिल झवर पुन्हा अज्ञातवासात गेला आहे.
फरार सुनिल झवर यास मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून चौदा दिवसांचे संरक्षण दिले होते. मुळ फिर्याद रद्द होण्याकामी सुनिल झवर याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पुणे विशेष सत्र न्यायालयात अटकपुर्व जामीनासाठी जावून त्यापुढील आठवड्यात न्यायालयाने निकाल देण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र सुनिल झवर याने विशेष न्यायालयात जाण्याएवजी उच्च न्यायालयात धाव घेऊन अटकपुर्व जामीनासाठी अर्ज केला. त्यावर उच्च न्यायालयाने फटकारत विशेष न्यायालयात जाण्यास बजावले.