अट्टल घरफोड्या शेख जहीर अटकेत

On: March 17, 2021 10:46 PM

जळगाव : भुसावळ शहरात घरफोड्या करणारा अट्ट्ल गुन्हेगार शेख जहीर यास स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले व त्यांच्या पथकाने भुसावळ शहरातील जाम मोहल्ला भागातुन अटक केली आहे.

लॉकडाऊन कालावधीत भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशन हद्दीत घरफोडी केल्याचे त्याने कबुल केले आहे. त्याच्याकडून 3 ग्रॅम वजनाचे सोन्याचे पदक व मणी तसेच 2500 रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. पुढील कारवाईकामी त्याला भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या गुन्ह्याच्या तपासकामी पो. नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अशोक महाजन, सहायक फौजदार शरीफ काझी, पो. ना. युनूस शेख, पो. ना. किशोर राठोड, पो. का. विनोद पाटील, पो. कॉ. रणजीत जाधव, चा.पो.कॉ. अशोक पाटील, चा. पो.कॉ. मुरलीधर बारी यांनी सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment