फक्त मराठी सह बॉक्स सिनेमा आणि महामूव्ही ची कोट्यावधीची मालमत्ता जप्त

On: March 18, 2021 10:40 AM

टीआरपी घोटाळा प्रकरणी टीव्ही चॅनल्सवर ईडीने कारवाई केली आहे या कारवाईत “फक्त मराठी”, “बॉक्स सिनेमा” आणि “महा मूव्ही” या चॅनल्सची 32 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. मुंबई, इंदूर, दिल्ली आणि देशातील विविध शहरातील स्थावर मालमत्तेसह बँक खात्यातील रकमेचा या कारवाईत समावेश आहे. या घोटाळ्याची खोली जवळपास 46 कोटी रुपयांपर्यंत असल्याचे म्हटले जात आहे.

या टीव्ही चॅनल्सनी बनावट टीआरपीच्या माध्यमातून जाहिराती मिळवण्याचा घोटाळा केला होता. हा घोटाळा मुंबई पोलिसांनी समोर आणला होता. या घोटाळ्याचा समांतर तपास ईडी देखील करत आहे. या कारवाईचा भाग म्हणून ‘फक्त मराठी’, ‘बॉक्स सिनेमा’ व ‘महा मुव्ही’ या वाहिन्यांच्या मुंबई, इंदूर, दिल्ली व गुरुग्राम या शहरातील मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आल्या आहेत. मनी लॉन्ड्रिंग कायद्यानुसार सदर कारवाई केली गेली आहे. ‘ईडी’च्या या कारवाईत मात्र रिपब्लिक टीव्हीचा उल्लेख नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment