धुळे एसीबीच्या सापळ्यात दुय्यम निबंधकासह पंटर ताब्यात

On: March 18, 2021 7:16 PM

जळगाव : वकीलाच्या पक्षकाराचे खरेदीखत रजिस्टर नोंदणी करण्याकामी दुय्यम निबंधकाच्या सांगण्यावरुन खासगी पंटरने तडजोडीअंती चारशे रुपयांपैकी तिनशे रुपयांची लाच पंच व साक्षीदारांसमक्ष घेतली. यावेळी धुळे एसीबीच्या सापळा पथकाने दोघांना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे.

हे देखील वाचा

अरुण संभाजी कापडणे (54) दुय्यम निबंधक श्रेणी – 1 दुय्यम निबंधक कार्यालय शिरपुर जिल्हा धुळे व खासगी पंटर सुनिल उर्फ छोटू पंडीत बाविस्कर (43) वाघाडी ता. शिरपूर अशा दोघांना एसीबीने ताब्यात घेतले आहे. 17 मार्च रोजी लाचेची मागणी व 18 मार्च रोजी लाच स्विकारण्याची व दोघे एसीबीच्या सापळ्यात अडकण्याची प्रक्रीया पुर्ण झाली. डिवायएसपी सुनिल कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. मनजीतसिंग चव्हाण व प्रकाश झोडगे यांनी आपले सहकारी सुधीर सोनवणे, कृष्णकांत वाडीले, संदीप सरग, भुषण खलानेकर, भूषण शेटे आदींनी हा सापळा यशस्वी केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment