जप्त प्रॅडो या कारचे मुळ मालक शिवसेना पदाधिकारी

On: March 19, 2021 11:44 AM

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर स्फोटक जिलेटीनने भरलेले स्कॉर्पिओ वाहन आणि त्या वाहनाचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्युप्रकरणी चौकशी व तपासकामी निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे सध्या एनआयएच्या अटकेत आहेत. याप्रकरणी नव्याने जप्त करण्यात आलेल्या प्रॅडो या महागड्या मर्सिडीज कारचे मुळ मालक शिवसेनेचे पदाधिकारी विजयकुमार भोसले असल्याचे तपासात समोर आले आहे. विजय कुमार भोसले हे मुंबईच्या चारकोप विधानसभा उपविभाग प्रमुख आहेत. जप्त करण्यात आलेल्या या प्रॅडो वाहनाने सचिन वाझे व मनसुख हिरेन सीपी कार्यालयात गेले होते. तपासाअंती एमएच 02 सीसी 0101 हा क्रमांकाच्या जप्त करण्यात आलेल्या वाहनाचे मुळ मालक विजयकुमार भोसले असल्याचे समोर आले आहेत. हे वाहन दोन वर्षापुर्वी ओएलएक्सवर विक्री केल्याचे त्यांच्या मुलाने म्हटले आहे.

सन 2014 मधे गुहागर विधामसभा मतदारसंघातून विजयकुमार भोसले यांनी शिवसेनेतर्फे निवडणूक लढवली होती. या निवडणूकीत त्यावेळचे नेते भास्कर जाधव विजयी झाले होते. गुहागर विधानसभेची ही जागा सन 2009 मधे शिवसेनेचे रामदास कदम यांनी देखील लढवली होती. ते देखील भास्कर जाधव या प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून पराभूत झाले होते. त्यानंतर भास्कर जाधव हे शिवसेनेत दाखल झाले व पुन्हा निवडून आले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment