पुढील चार दिवसात पावसाची शक्यता

On: March 19, 2021 12:20 PM

औरंगाबाद : पुढील चार दिवसात राज्यातील काही जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, नागपूर, भंडारा, गोंदिया नांदेड तसेच वर्धा जिल्ह्यात सतर्कतेच इशारा देण्यात आला आहे. याशिवाय कोकण – गोव्यासह, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात या चार दिवसाच्या कालावधीत विविध ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या बेमोसमी पावसामुळे शेतक-यांच्या समस्येत मोठ्या प्रमाणात भर पडणार असल्याचे बोलले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment