मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी पो.नि. सुनील माने यांची चौकशी

On: March 19, 2021 3:08 PM

मुंबई : एटीएस कडून मनसुख हिरेन यांच्या मृत्यूची चौकशी सुरु आहे. याप्रकरणी कांदिवली क्राईम ब्रॅंच युनिटचे पोलीस निरीक्षक सुनील माने यांना चौकशीकामी बोलावण्यात आले आहे.

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळून आली होती. मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत मृतावस्थेत आढळून आलेल्या मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमल हिरेन यांनी माध्यमांसोबत बोलतांना म्हटले आहे की कांदीवली गुन्हे शाखेच्या कार्यालयातून तावडे नामक कर्मचा-याचा चौकशीकामी बोलावण्यात आल्याचा फोन आला होता. फोन आल्यानंतर बाहेर गेलेल्या मनसुख हिरेन यांचा मृतदेहच आढळून आला होता. त्यामुळे कांदिवली क्राईम बॅंचचे पोलिस निरिक्षक सुनिल माने यांची चौकशी सुरु असल्याचे म्हटले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment