चायना लस घेतल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या होम आयसोलेशन मधे असलेल्या इमरान खान यांनी 18 मार्च रोजी चिनी लस घेतली होती. त्यांचे विशेष सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. फैसल सुल्तान यांच्यासह एएनआयने ट्वीटच्या माध्यमातून सदर वृत्त दिले आहे. 18 मार्च रोजी पाक पंतप्रधान इमरान खान यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधान इमरान खान यांनी चीनकडून दहा लाख कोरोना लस आयात करण्याची योजना आखली आहे. कोरोना लसीसाठी पाक सध्या चीनवर अवलंबून आहे. याकामी दोन चिनी कंपन्यांसाठी करार देखील करण्यात आला आहे.
हे देखील वाचा
कोरोनाची लक्षणे दिसताच शिक्षकाची आत्महत्या








