मुंबई : मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन दुर सारण्यात आलेले नाराज अधिकारी परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र दिले आहे. या पत्रात गृहमंत्र्यांकडून सध्या निलंबित स.पो.नि. सचिन वाझे यांना दरमहा शंभर कोटी रुपयांचे उद्दीष्ट देण्यात आले होते असे म्हटले आहे. याबाबत पत्रात दहाव्या क्रमांकाच्या मुद्द्यात त्यांनी एसीपी पाटील नामक अधिका-यांसमवेत झालेला संवाद सादर केला आहे. हा संवाद तारीख आणि वेळेसह नमुद करण्यात आला आहे. हा संवाद खालीलप्रमाणे असल्याचे सांगितले जात आहे.
परमबीर सिंह – पाटील, गृहमंत्री व पलांडेंनी किती बार व रेस्टॉरंट व किती रुपयांचे टार्गेट दिल्याचे सांगितले ? – अर्जंट प्लीज
एसीपी पाटील – 1750 बार व रेस्टॉरंट प्रत्येकी 3 लाख रुपये. एकूण कलेक्शन अंदाजे 50 कोटी रुपये. पलांडेनी माझ्यासोबत भुजबळ होते तेव्हा ही अपेक्षा व्यक्त केली.
परमबीर सिंह – तुम्ही पलांडेंना कधी भेटलात ?
एसीपी पाटील – आम्ही 4 मार्चला भेटलो
परमबीर सिंह – तुम्ही गृहमंत्र्यांना कधी भेटलात ?
एसीपी पाटील – पलांडेंना भेटलो त्याच्या 4 दिवस आधी हुक्का पार्लरसंबंधी बैठक झाली.
परमबीर सिंह – वझे व गृहमंत्र्यांची भेट कधी झाली ?
एसीपी पाटील – वझे-गृहमंत्र्यांच्या भेट कधी झाले ते आता आठवत नाही.
परमबीर सिंह – तुम्ही म्हणाला होतात की काही दिवसांपूर्वीच भेट झाली होती.
एसीपी पाटील – हो सर बहुधा फेब्रुवारीच्या अखेरीस.
परमबीर सिंह – पाटील मला आणखी काही माहिती हवीय. गृहमंत्र्यांना भेटून आल्यानंतर वझे तुम्हाला भेटला होता का ?
एसीपी पाटील – हो सर. वझे मला भेटला होता.
परमबीर सिंह – गृहमंत्र्यांनी काय सांगितले आहे ते वझेंनी तुम्हाला सांगितले का ?
एसीपी पाटील – गृहमंत्र्यांनी 1750 बार-रेस्टॉरंटकडून प्रत्येकी 3 लाख रुपये व एकूण 40-50 कोटींच्या वसुलीचे लक्ष्य दिलेय असे वझेने सांगितले.
परमबीर सिंह – अच्छा..म्हणजे वझेने मला सांगितले तेच तुम्हालाही सांगितलेय.
एसीपी पाटील – 4 मार्चला पलांडे यांनी मलासुद्धा वझेला हेच टार्गेट दिलेय ते सांगितले.







