सचिन वाझे 3 एप्रिलपर्यंत एनआयए कोठडीत

On: March 25, 2021 6:14 PM

मुंबई : सचिन वाझे यांचा एनआयए कोठडीतील मुक्काम 3 एप्रिलपर्यंत वाढला आहे. आपल्याला बळीचा बकरा बनवण्यात आले असून आता पुन्हा एनआयए कोठडी देऊ नका असे वाझे यांनी न्यायालयास म्हटले. मी केवळ दिड दिवस या प्रकरणाचा तपास अधिकारी होता तसेच अजून काही गोष्टी सांगायच्या असल्याचे देखील वाझे न्यायालयासमक्ष म्हणाले. आपणास जे काही सांगायचे असेल ते लिखीत स्वरुपात द्या असे निर्देश एनआयए न्यायालयाने वाझे यांना दिले.

देशातील प्रमुख उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर सापडलेल्या जिलेटीनने भरलेल्या वाहनाप्रकरणी सचिन वाझे यांच्याविरुद्ध आता गैरकायदा कृत्य प्रतिबंधित अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दहशतवादी कारवाया अथवा राष्ट्रविरोधी कारवायांविरुद्ध ही कलमे लावण्यात येतात. या कलमांसंदर्भात आज एनआयए न्यायालयात सुनावणी झाली. एएसजी अनिल सिंह यांनी उद्योगपती अंबानी यांच्या बंगल्याबाहेर आढळून आलेल्या स्कॉर्पिओमधील धमकीचे पत्र न्यायालयात वाचून दाखवले. त्यात म्हटले आहे की ‘अगलीबार यह सब सामान कनेक्ट होके आएगा, समझ जा, तुझे और तेरी पुरी फॅमिली को उडाने का बंदोबस्त कर दिया है’. या वाहनात आढळून आलेल्या दुस-या पत्रात असभ्य आणि अश्लिल शब्दांचा उल्लेख असल्यामुळे ते पत्र सरकारी वकिलांनी वाचून दाखवण्याएवजी ते न्यायालयाकडे सोपवले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment