मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी व उद्योजक मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणातील पुरावे शोधण्यात एनआयएला यश मिळत आहे. नष्ट करण्यात आलेले पुरावे बिकेसी येथील मिठी नदीत मिळू लागले आहेत. या नदीतून कॉम्प्यूटरचे काही सुटे भाग, डीव्हीआर, सीपीयू आदी साहित्य बाहेर काढण्यात आले आहेत.
यामुळे मनसुख हिरेन मृत्यू व मुकेश अंबानी धमकी प्रकरणी तपासकामी गती येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दोन्ही प्रकरणांचा तपास एनआयए करत आहे. या दोन्ही प्रकरणांशी संबंधीत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचे तपासाअंती पुढे आले आहेत. सीपीयु, डीव्हीआर आदी घटकांची शोधमोहीम राबवतांना एनआयए अधिका-यांसमवेत निलंबीत अधिकारी सचिन वाझे देखील होते.