मुंबईला जाण्यास नकार – एसटीचे 14 कर्मचारी निलंबित

On: March 29, 2021 11:45 AM

बीड : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मुंबईला ड्युटीसाठी जाण्यास नकार देणा-या बिड जिल्ह्याच्या परळी आगारातील एसटी महामंडळाच्या बसवाहक, चालकांना निलंबीत करण्यात आले आहे. मुंबई येथील बेस्ट सेवेसाठी सक्तीने रवाना केले जात असल्यामुळे चालक वाहक हैरान झाले आहेत.

गेल्या सहा महिन्यापासून बीड जिल्ह्यातील राज्य मार्ग परिवहन कर्मचाऱ्यांना मुंबई येथे पाठवले जात आहे. परळी आगारात 354 कर्मचारी कार्यरत आहेत. आतापावेतो या सर्वांना बेस्ट सेवेसाठी मुंबई येथे रवाना करण्यात आले आहे. मुंबईला जावून आलेले अनेक कर्मचा-यांचा अहवाल कोरोना पॉझीटीव्ह आला आहे. मुंबईत बेस्टच्या सेवेसाठी जाण्यास नकार देणाऱ्या परळी आगारातील 14 कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment