मोबाईल चोर एलसीबीच्या ताब्यात

On: March 30, 2021 7:24 PM

जळगाव : जळगाव शहरातील टॉवर चौकातून नेहरु चौकाकडे जाणा-या तरुणाचा मोबाईल फोन जबरीने हिसकावून नेण्याची घटना 29 मार्च रोजी घडली होती. याप्रकरणी जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी एलसीबीचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली समांतर तपास सुरु होता. या गुन्ह्याच्या तपासात आकाश संजय मराठे (रा. चौगुले प्लॉट जळगाव) यास आज शिताफीने अटक करण्यात आली असून त्याच्या ताब्यातून विवो कंपनीचा मोबाईल व गुन्ह्यत वापरलेली होंडा शाईन कंपनीची मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे. आरोपीसह मुद्देमाल जळगाव शहर पोलिसांच्या ताब्यात पुढील तपासकामी देण्यात आला आहे. अटकेतील आरोपी आकाश मराठे याच्याविरुद्ध यापुर्वी जबरी चोरी व गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्याच्या तपासकामी पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र पाटील, विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, प्रितम पाटील, नितीन बाविस्कर, राहुल पाटील, नंदलाल पाटील, भगवान पाटील यांनी सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment