ऑक्सिजन सिलेंडरसह आंदोलनकर्त्या कोरोना रुग्णाचा मृत्यू

On: April 1, 2021 7:08 PM

नाशिक : रुग्णालयात बेडची कमतरता असल्यामुळे नाशिक महापालिकेत ऑक्सिजन सिलेंडरसह आंदोलन करणा-या कोरोनाबाधीत रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे. या रुग्णाला महापालिकेत घेऊन येणा-य सामाजीक कार्यकर्त्यावर गुन्हा नोंद करण्यात आला असल्याने खळबळ माजली आहे. नाशिकच्या सिडको परिसरातील एका कोरोनाबाधीत रुग्णाला रुग्णालयात बेड मिळत नव्हता. अखेर त्याने ऑक्सिजन सिलेंडरसह महापालिकेचे राजीव गांधी भवन गाठत तेथेच प्रवेशद्वारावर आंदोलन सुरु केले. त्यानंतर प्रशासनाने संबंधीत रुग्णाला बिटको रुग्णालयात दाखल करुन घेतले. उपचार घेत असतांना रुग्णाचा मृत्यू झाला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment