आजचे राशी भविष्य (2/5/2021)

मेष : मिळकतीचे नवनवीन मार्ग उपलब्ध होवू शकतात. अचानक धनलाभाचे योग.

वृषभ : जबाबदारीकडे दुर्लक्ष करु नका. दिवसाच्या उत्तरार्धात एखादी चांगली गोष्ट ऐकायला मिळेल.

मिथुन : अध्यात्मिक क्षेत्रात मन रमेल. हाती घेतलेली कामे पूर्ण झाल्यामुळे मनाला समाधान लाभेल.

कर्क : सामाजिक प्रशंसेस पात्र रहाल. स्वयंरोजगाराच्या क्षेत्रातील व्यक्तींना चांगला दिवस.

सिंह : प्रगतीचे मार्ग योग्य त्या प्रमाणात प्रशस्त होतील. ध्यानधारणेतून मानसिक शांतता मिळेल.

कन्या : प्रिय व्यक्तीची चांगली साथ मिळून प्रलंबित कामे पूर्ण होतील. करिअरचे मार्ग प्रशस्त होतील.

तुळ : अति उत्साहात कामे करताना तब्बेतीकडे देखील लक्ष द्या. हितशत्रूंपासून सावध रहा.

वृश्चिक : नवीन तंत्रज्ञान व्यापारात लाभदायक ठरेल. गुंतवणुक फायदेशीर ठरेल.

धनु : स्थावर संपत्तीतून लाभ होण्याची शक्यता. बेरोजगारांना नोकरीच्या नविन संधी मिळतील.

मकर : राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना नव्या संधी मिळण्याची शक्यता. जोडीदाराचे चांगले सहकार्य लाभेल.

कुंभ : कौटुंबिक सुख, समृद्धी वृद्धिंगत होवून सुख समाधान लाभेल. तज्ज्ञांचा सल्ला लाभदायक ठरेल.

मीन : प्रिय व्यक्तीची गाठ-भेट होण्याचे योग आहेत. नोकरीत बढतीचे संकेत मिळण्याची शक्यता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here