चाळीसगावच्या कपाशी व्यापा-यास मिळाली साडे आठ लाखाची रक्कम

On: April 2, 2021 9:27 PM

नाशिक : चाळीसगाव तालुक्यातील कापसाचे व्यापारी सुनिल श्रावण चौधरी (रा. लोंढे ता. चाळीसगाव) हे मालेगाव येथून चाळीसगाव येथे मोटारसायकलने जात असतांना मालेगाव तालुका पोलिस स्टेशन हद्दीत सायने गाव शिवारात त्यांची तिघा जणांकडून लुट झाली होती. या रस्ता लुटीत सुनिल चौधरी यांना पिस्तुलचा धाक दाखवत लाकडी दांड्याने मारहाण करत त्यांच्या कब्जातील 20 लाख 6 हजार 200 रुपये असलेली बॅग हिसकावण्यात आली होती.

या जबरी लुटीप्रकरणी मालेगाव तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा भाग 5 गु.र.न. 162/20 भा.द.वि. 394, 341 सह आर्म अ‍ॅक्ट 3/25 नुसार दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासात खुशाल अशोक मोकळ, रितीक राजेंद्र राजपुत व अविनाश सुरेश माने या तिघांना नाशिक ग्रामीण पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. लुट करण्यात आलेली 8 लाख 47 हजार 500 रुपयांची रक्कम अटकेतील आरोपींकडून हस्तगत करण्यात आली होती.
न्यायालयाच्या आदेशाने हस्तगत करण्यात आलेली लुटीची 8 लाख 47 हजार 500 रुपयांची रक्कम मुळ मालक व तक्रारदार सुनिल श्रावण चौधरी यांना पोलिस अधिक्षक सचिन पाटील व पोलिस निरिक्षक देवीदास ढुमणे यांच्या हस्ते परत करण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment