जळगाव : जळगाव औरंगाबाद महामार्गावरील पुल निर्मीतीच्या कामाचा ठेकेदार सुधीर व्यंकटेश्वर रवीपती (आंध्रप्रदेश) यास 3 एप्रिलच्या रात्री तिघा लुटारुंनी लुटल्याची घटना घडली होती. यातील एकाने लिफ्ट मागून सुधीर रवीपती याच्या कारमधे बसण्याचे काम केले होते. त्यानंतर लिफ्ट मागणा-या तरुणाच्या दोघा साथीदारांनी सुधीर रवीपती याचे वाहन अडवून लुटमार केली होती. या घटनेत सुधीर रवीपती यास मारहाणीसह त्याच्या गळ्यातील 16 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, पाच ग्रॅम वजनाच्या प्रत्येकी दोन अंगठ्या व रोख रक्कम लुटून नेली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेच्या तपासात आकाश सुरेश चव्हाण (रायपुर कुसुंबा), निवृत्ती उर्फ भगवान शांताराम बाविस्कर (जैनाबाद – जळगाव) व राहुल रामदास कोळी (कोळीवाडा – जळगाव) या तिघांना जैनाबाद येथून ताब्यात घेण्यात आले. त्यांनी गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल (एम एच 19 बीव्ही 7695) तपासकामी जप्त करण्यात आली आहे. फरार आरोपी आकाश चव्हाण याचा शोध सुरु आहे. या गुन्ह्याच्या तपासकामी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. अमोल मोरे, सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, अतुल वंजारी, जितेंद्र राजपूत, किशोर पाटील, इमरान सैय्यद, विजय बावस्कर, मुदस्सर काझी, हेमंत कळसकर, चंद्रकांत पाटील, सचिन पाटील, योगेश बारी, आसिम तडवी, साईनाथ मुंढे आदींनी तपासकामात सहभाग घेतला.