गॅस सिलेंडर चोरटा एलसीबीच्या ताब्यात

On: April 6, 2021 8:36 AM

जळगाव : मध्यरात्री राबवण्यात आलेल्या कोंबींग ऑपरेशन दरम्यान गॅस सिलेंडर चोरटा एलसीबीच्या जाळ्यात गवसला आहे. सायबोद्दीन उर्फ सायबु शेख नजमोद्दीन शेख (परपोट मोहल्ला नशिराबाद ता.जि. जळगांव) असे चोरट्याचे नाव असून त्याला जळगाव शहरातील बळीराम पेठ भागातील शिवाजी चौक काट्याफाईल भागातून पळून जाण्याच्या बेतात असतांना चोरीच्या गॅस सिलेंडरसह ताब्यात घेण्यात आले आहे. 2 एप्रिल रोजी सकाळी 3 ते 4 वाजेच्या दरम्यान आरोपी सायबोद्दीन शेख याने बळीराम पेठ भागातील रहिवासी अराफत अहमद यांच्या वॉल कंपाऊंडमधून ते सिलेंडर चोरुन नेले होते.

गॅस सिलेंडर चोरीप्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला गु.र.न. 95/21 भा.द.वि.379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्य मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अशोक महाजन, हे.कॉ. जितेंद्र पाटील, पो.हे.कॉ.विजयसिंग धनसिंग पाटील, पो.हे.कॉ. सुधाकर रामदास अंभोरे, पो.हे.कॉ.विलास बाबुराव पाटील, पो.ना. नितीन प्रकाश बाविस्कर, पो.ना.राहुल जितेंद्रसिंग पाटील, पो.ना. प्रीतम पितांबर पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. आरोपी सायबोद्दीन यास मुद्देमालासह पुढील तपासकामी जळगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment