नाशिक : नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील कोविड सेंटर आजपासून सुरु होणार होते. त्यापुर्वीच हे खासगी कोविड सेंटर आगीच्या भक्षस्थानी सापडले आहे. आज दुपारी लागलेल्या या आगीने काही वेळातच रौद्ररुप धारण केले. या कोविड सेंटरच्या खाली फर्निचरच्या दुकानाला आग काही क्षणातच कोविड सेंटरपर्यंत पोहोचण्यास वेळ लागला नाही. घटनास्थळावर अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.