जळगाव : एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत तिन ठिकाणी सुरु असलेल्या सट्टा जुगारावर आज धाडी टाकून कारवाई करण्यात आली. सिंधी कॉलनी परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत रोख 930 रुपये आणी सट्टा जुगाराची साधने जप्त करण्यात आली. या कारवाईत शब्बीर खान हमीद खान याच्यावर मुंबई जुगार प्रतिबंध कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. या प्रकरणी गोविंदा पाटील यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
दुस-या कारवाईत खेडी पेट्रोल पंपाजवळ असलेल्या पेढीवर दिपक रमेश मोरे याच्याविरुद्ध इमरान अली युनुस अली यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत 760 रुपये रोख व जुगाराची साधने जप्त करण्यात आली. तिस-या कारवाईत रामेश्वर कॉलनी अशोक किराणा परिसरातील पेढीवर छापा टाकण्यात आला. या छाप्यात कुणाल हरपले याच्या ताब्यातून 360 रुपये रोख व सट्टा जुगाराची साधने, किशोर धारवाले याच्या ताब्यातून 245 रुपये रोख व सट्टा जुगाराची साधने तसेच विक्रम नाईक याच्या ताब्यातून 640 रुपये रोख व सट्टा जुगाराची साधने हस्तगत करण्यात आली. याप्रकरणी गोविंदा पाटील यांच्या फिर्यादीनुसार रितसर गुन्हा दाखल करण्यात आला. तिन्ही कारवाईत पोलिस उप निरीक्षक विशाल वाठोरे, पोलिस नाईक सचिन मुंडे, किशोर पाटील व मुकेश पाटील यांनी सहभाग घेतला.