पेट्रोलपंप चालकाची रिव्हाल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या

On: April 7, 2021 6:36 PM

नाशिक : नाशिक येथील पेट्रोलपंप चालकाने आज दुपारी पावने दोन वाजता आपल्या ताब्यातील कार चालवत असतांना रिव्हाल्व्हरने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दरम्यान सटाणा पोलिस स्टेशन हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

नंदलाल गणपत शिंदे (55) असे गोळी झाडून आत्महत्या केलेल्या व जागीच मृत्युमुखी पडलेल्या पेट्रोलपंप चालकाचे नाव आहे. मयत नंदलाल शिंदे हे मुळचे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील सामोडे येथील रहिवासी होते. नाशिकच्या डीजीपी नगरात त्यांचा रहिवास होता. सटाणा पोलिस स्टेशन हद्दीतील सटाणा ते ताहराबाद रस्त्यावरील जोगेश्वर फर्टीलायझर नजीक औंदाणे शिवारात आपल्या मुळगावी कारने जात असतांना त्यांनी स्वत:वर रिव्हाल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेमागचे नेमके कारण अद्द्याप पुढे आलेले नाही. या प्रकरणी सटाणा पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. साक्री तालुक्यातील दहिवेल येथे त्यांच्या मालकीचा पेट्रोल पंप आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment