पत्नीने केली पतीची हत्या

On: April 7, 2021 7:16 PM

जळगाव : सतत चारित्र्याचा संशय घेणा-या पतीचा पत्नीने खून केल्याची घटना जळगाव जिल्ह्याच्या जामनेर तालुक्यातील गोंडखेल येथे घडली आहे. याप्रकरणी मयत पतीच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपी पत्नीविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 6 एप्रिल रोजी रात्री संशयीत पत्नीने तिच्या पतीला तो झोपेत असतांना दोरीने गळफास दिला असल्याचा आरोप आहे. या घटनेप्रकरणी जामनेर पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिलीप विश्वनाथ सोनवणे (35) असे मयताचे नाव असून संगिता दिलीप सोनवणे असे पतीच्या हत्येचा आरोप असलेल्या संशयीत पत्नीचे नाव आहे. कल्पना युवराज जाधव यांच्या फिर्यादीनुसार याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीत संगिता हिस अटक करण्यात आली असून पो.नि. प्रताप इंगळे यांच्या अख्त्यारीत पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment