12 एप्रिल रोजी विभागीय लोकशाही दिन रद्द

On: April 8, 2021 4:25 PM

नाशिक : “ब्रेक द चेन” अंतर्गत कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. सदर निर्बंध 5 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान राहणार आहेत. त्यामुळे 12 एप्रिल रोजी नाशिक येथे होणारा विभागीय लोकशाही दिन रद्द करण्यात आला असल्याचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी कळवले आहे.

दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे केले जात असते. मात्र कोरोणा विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सदर लोकशाही दिन होणर नसल्याचे कळवण्यात आले आहे. नाशिक विभागाच्या अंतर्गत नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगांव आणि नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातून केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment