जळगाव पोलिस अधिक्षक कार्यालयात अर्ज, खुलासे, निवेदन आता ऑनलाईन

जळगाव : शासनाकडुन लागु करण्यात आलेल्या विशेष निर्बंधाच्या अनुषंगाने जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयात कामानिमित्ताने येणा-या अभ्यागतांसाठी पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी काही विशेष सुचना दिल्या आहेत.

शासकीय कार्यालयात होणा-या गर्दीवर नियंत्रण आणण्याकामी अभ्यागतांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अभ्यागतांनी त्याचे अर्ज प्रकरणे, निवेदन, खुलासे प्रत्यक्ष कार्यालयात येवून सादर न करता पोलीस अधीक्षक कार्यालयातील शासकीय ई मेल, व्हाटस अ‍ॅप व फोन नंबरवर सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहेत. कुणीही अभ्यांगत थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रत्यक्षरित्या टपाल देयासाठी अथवा इतर कामासाठी येणार नाही.

अभ्यागतांनी आपले अर्ज, तक्रारी, निवेदन व खुलासे पुढील व्हाटसअ‍ॅप क्रमांक, ई मेल वर पाठवावेत. पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, व्हॉट्सॲप नंबर – 7219091773 – फोन नंबर – 02572220411 ई मेल – [email protected] अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी – व्हॉट्सॲप नंबर – 9860647291 फोन नंबर – 02572220412 ई मेल – [email protected] सहायक पोलिस अधीक्षक, जळगाव उपविभाग कुमार चिंथा, व्हॉट्सॲप नंबर – 7020625228 फोन नंबर – 02572220414 ई मेल – [email protected]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here