गावठी कट्टा बाळगणारा मालेगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात

On: April 8, 2021 6:11 PM

मालेगाव : मालेगाव तालुका पोलिस स्टेशन हद्दीतील चाळीसगाव फाटा भागात बेकायदा गावठी कट्टा बाळगणा-या फैजान अहमद शब्बीर अहमद (रा. नयापुरा) याला पो.नि. देवीदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शिताफीने अटक केली आहे.

चाळीसगाव फाटा परिसरातील रस्त्यालगत असलेल्या एका शेडमधे फैजान अहमद हा गावठी कट्ट्यासह लपून बसला होता. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्याला तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक सुभाष चोपडा व कैलास चोथमल या दोघांनी शिताफीने ताब्यात घेत अटक केली. नाशिक ग्रामीणचे पोलिस अधिक्षक सचिन पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. करण्यात आलेल्या या कारवाईत पो.नि. देवीदास ढुमणे व त्यांचे सहकारी कैलास चोथमल व सुभाष चोपडा यांनी कारवाईत सहभाग घेतला. याप्रकरणी मालेगाव तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment