सहकारी महिलेस लग्नाचे अमिष दाखवत लैंगिक अत्याचार

On: July 6, 2020 4:32 PM

पिंपरी : नोकरीच्या ठिकाणी सहकारी विवाहित महिलेशी सलगी करत लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. या प्रकरणी तरुणाविरुद्ध हिंजवडी पोलिस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील पिडीत विवाहीतेला एक मुलगा आहे. तुझ्या मुलाचा सांभाळ करेन, तुझ्याशी लग्न करेन असे आमिष दाखवून संशयीत आरोपीने तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला आहे. 

याप्रकरणी ३५ वर्षीय पीडित महिलेने हिंजवडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. किवित अशोक पाटील (३०) रा. सूसगाव, ता. मुळशी असे अटकेतील संशयीत तरुणाचे नाव आहे. पीडित महिला आणि संशयीत आरोपी हे दोघे एकाच कंपनीत कामाला आहेत.

दोघे एकमेकांच्या परिचयातील आहेत. त्याने वेळोवेळी त्याच्या घरी व पिडीतेच्या घरी लैंगीक अत्याचार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. दरम्यानच्या काळात सदर पिडीता गरोदर राहीली. एका खासगी रुग्णालयात तिचा गर्भपात करण्यात आला. याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी संशयीताला अटक केली. हिंजवडी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment