अ‍ॅड. राजेश गवई लाचेच्या सापळ्यात

ACB-Crimeduniya

जळगाव : भुसावळचे विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. राजेश गवई यांना 5 हजार रुपयांची लाच घेतांना नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 9 एप्रिल रोजी ताब्यात घेतले आहे. वरणगाव पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपींना जामीन मिळू नये, त्यांना विरोध करावा याकामी सरकारतर्फे बाजू मांडण्याकामी तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच सरकारी वकील अ‍ॅड. राजेश गवई यांच्याकडून मागण्यात आली होती.

जळगाव येथील तापी पाटबंधारे कार्यालयासमोर रस्त्यावर पाच हजार रुपयांची लाच घेतल्यानंतर लपून बसलेल्या एसीबीच्या सापळा पथकाने अ‍ॅड. गवई यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. 9 एप्रिल रोजी झालेल्या या कारवाईमुळे न्यायदान क्षेत्रात खळबळ माजली आहे. नाशिक परिक्षेत्र एसीबीचे पोलिस अधिक्षक सुनिल कडासने, अप्पर पोलिस अधिक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकचे सापळा अधिकारी पो.नि. प्रशांत सपकाळे व सहका-यांनी या सापळ्यात सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here