जळगाव : औरंगाबाद महामार्गावरील आरएल चौफुलीजवळ रात्र गस्तीदरम्यान रिक्षा चोरटा एमआयडीसी पोलिस पथकाला गवसला आहे. आज मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस उप निरीक्षक रामकृष्ण पाटील, सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलिस नाईक गणेश शिरसाळे, पो.नाईक मिलींद सोनवणे, पो.कॉ. सुधिर साळवे, हेमंत रघुनाथ कळसकर व चंद्रकांत पाटील असे रात्रगस्तीवर होते.
या गस्तीदरम्यान पथकाला प्रद्युम्न उर्फ बंटी नंदु महाले हा विस वर्ष वयाचा तरुण संशयीतरित्या फिरतांना आढळून आला. त्याला चौकशीकामी ताब्यात घेतले असता त्याने शनीपेठ पोलिस स्टेशन हद्दीतून प्रवासी रिक्षा चोरी केल्याची कबुली दिली. या रिक्षा चोरीप्रकरणी शनीपेठ पोलिस स्टेशनला गु.र.न. 35/21 भा.द.वि. 392 नुसार गुन्हा दाखल आहे. ताब्यातील प्रद्युम्न उर्फ बंटी नंदु महाले (रा. व्यसनमुक्ती केंद्र पिंप्राळा हुडको जळगाव) याला शनीपेठ पोलिसांच्या ताब्यात पुढील कारवाईकामी देण्यात आले आहे.