जळगाव : जळगाव शहरातील नागसेन नगर रामेश्वर कॉलनी भागात तलवारीच्या बळावर दहशत माजवणा-या तरुणास एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने शिताफीने ताब्यात घेत तलवारीसह अटक केली आहे. रितेश उर्फ चिच्या कृष्णा शिंदे असे त्याचे नाव आहे.
तलवार बाळगणा-या रितेश याने पोलिस पथकासोबत हुज्जत केल्यामुळे त्याला ताब्यात घेतांना बळाचा वापर करावा लागला. त्यात तो जमीनीवर पडल्यामुळे जखमी झाला. अखेर त्याला शिताफीने ताब्यात घेण्यात गुन्हे शोध पथकाला यश आले. त्याच्या ताब्यातून लोखंडी तलवार हस्तगत करण्यात आली. त्याच्या विरुद्ध पो.कॉ. गोविंदा विश्राम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.