जळगाव : जिगर बोंडारे या गुन्हेगाराच्या टोळीतील सराईत गुन्हेगार अजय सुदाम भिल (उमाळा – जळगाव) यास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. अटकेतील अजय भिल याने गेल्या वर्षी एका व्यापा-यास मारहाण करत त्याच्याजवळ असलेले सोने व रोख रक्कम लुटून नेली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गु.र.न. 1050/20 भा.द.वि. 394, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून अजय भिल हा फरार होता.
सराईत गुन्हेगार अजय भिल हा वेषांतर करुन उमाळा गावात आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किरणकुमार बकाले यांना समजली. त्यांनी आपले सहकारी हे.कॉ. प्रदीप पाटील, जयंत चौधरी, विजय पाटील, पंकज शिंदे यांना उमाळा गावी त्याला ताब्यात घेण्याकामी रवाना केले. पथकातील कर्मचा-यांनी अजय भिल यास शिताफीने ताब्यात घेत अटक केली. एमआयडीसी पोलिस स्टेशनला दाखल लुटीच्या गुन्ह्याची त्याने कबुली दिली आहे. पुढील तपासकामी त्याला एमआयडीसी पोलिसांच्या हवाली केले आहे.