जळगाव : भुसावळ शहरातील मॉडर्न रोडवरील सुरेंद्र वालवाणी यांच्या मालकीच्या हरीओम इलेक्ट्रॉनिक्स य दुकानात गेल्यावर्षी 2 लाख 26 हजार 350 रुपयांच्या मालाची चोरी झाली होती. अज्ञात चोरट्याने दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून दुकानात बेकायदा प्रवेश करत चोरीचा गुन्हा केला होता. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 739/20 भा.द.वि. 454, 457, 380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याच्या तपासात अहमद उर्फ अटेक बशीर खान (24) रा.जाम मोहल्ला भुसावळ याचे नाव निष्पन्न झाले होते. सहायक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार फरार आरोपी अहमद हा शहरातील जाम मोहल्ला भागात आला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला जाम मोहल्ला भागातून ताब्यात घेत अटक करण्यात आली. अटकेतील आरोपी अहमद लोहमार्ग खंडवा पोलिस स्टेशनला दाखल जबरी चोरीच्या गुन्ह्यात फरार आहे. खंडवा लोहमार्ग पोलिसांनी त्याच्याविरुद्ध पकड वारंट देखील काढले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, सहायक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. अनिल मोरे, पो.ना.रविंद्र बिऱ्हाडे, समाधान पाटील, पो.का. विकास सातदिवे, ईश्वर भालेराव यांनी तपासकामी सहभाग घेतला.