जळगाव : यावल तालुक्यातील वड्री परसाडे गावानजीक प्रेमीयुगुलाने झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आपली जिवनयात्रा संपवल्याची घटना आज उघडकीस आली. मिना शावखा तडवी (22) रा. परसाडे व शाहरुख बाबु तडवी (19) रा. हरीपुरा असे मयत झालेल्या प्रेमीयुगुलाचे नाव आहे. वड्री येथील पोलिस पाटील इब्राहिम तडवी यांनी दिलेल्या खबरीनुसार यावल पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.