जळगावसह जालना, बुलढाणा व नाशिक येथील दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस

औरंगाबाद : औरंगाबाद स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास लावला आहे. या तपासात जळगाव, जालना, बुलढाणा व नाशिक येथील मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. या तपासात ताब्यात घेतलेल्या टोळीसह 2 लाख 45 हजार रुपये किमतीच्या 8 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

ताब्यातील आरोपीसह मोटारसायकली सिल्लोड शहर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. औरंगाबाद ग्रामीण पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पो.नि. भागवत फुंदे, पो.उ.नि. गणेश राऊत, पो.कॉ. बाळू पाथरीकर आदींनी तपासकामी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here