औरंगाबाद : पोलिसांनी केलेल्या मारहाणीत सलून चालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्यामुळे औरंगाबाद येथील उस्मानपुरा पोलिस स्टेशन आवारात दुपारी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मयताच्या नातेवाईकांनी मृतदेह पोलिस स्टेशन आवारात आणत दोषींवर कारवाईची मागणी केली होती. फिरोज खान कदिर खान (50), रा.उस्मानपुरा परिसर असे मयताचे नाव आहे. सलूनचे दुकान सुरु ठेवल्यामुळे कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांनी केलेल्या मारहाणीत फिरोज याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता.