जळगाव : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार तथा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन कार्यक्रम झाला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, तहसिलदार सुरेश थोरात, तहसिलदार पंकज लोखंडे, सहाय्यक पुरवठा अधिकारी प्रशांत कुलकर्णी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.