जळगाव : व्हाटसअॅप वर चिथावणीखोर स्टेटस ठेवल्यामुळे सारवान व शिंदे या दोन गटातील वादातून गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी शनीपेठ पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राहुल अशोक शिंदे, , किशोर जयवंत शिंदे व विजय जयवंत शिंदे या तिघांना अटक करण्यात आली होती. गोळीबार करण्यासह धाक दाखवण्यासाठी गुन्ह्यात वापरलेले दोन पिस्टल पोलिस कोठडीदरम्यान विजय शिंदे याच्याकडून हस्तगत करण्यात आले आहेत. या गुन्ह्याच्या तपासकामी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले व त्यांचे सहकारी स.पो.नि.स्वप्निल नाईक, हे.कॉ. विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, नरेंद्र वारुळे, नितीन बाविस्कर, प्रितम पाटील, राहुल पाटील यांच्यासह शनीपेठ पोलिस स्टेशनचे पो.नि. विठ्ठल ससे, पोलिस उप निरीक्षक अमोल कवडे, सहायक फौजदार सलीम पिंजारी, हे.कॉ. रविंद्र पाटील, परिष जाधव, गिरीष पाटील, अमोल विसपुते, अमित बाविस्कर, राहुल पाटील, राहुल घेटे, अनिल कांबळे, मुकूंद गंगावणे यांनी तपासात सहभाग घेतला.