जळगाव : स्पिरिटचा वापर करुन मॅक्डॉल नंबर 1, व्हिस्की, इम्पेरियिअल ब्ल्यु, देशी दारु टॅंगो पंच या कंपनीचे बनावट मद्य तयार करुन विक्री करणा-या महिलेस मद्य निर्मीतीच्या साहित्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अशोक महाजन, सुनिल दामोदरे, शरद भालेराव, ललीता सोनवणे, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, नंदलाल पाटील, भगवान पाटील, भारत पाटील यांनी या तपासकामी सहभाग घेतला. अटकेतील महिलेवर एमआयडीसी पोलिस स्टेशनला मुंबई दारुबंदी कायदा कलम 65(ई), भा.द.वि. 3द28, 420, 465 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.