देहरादून – हृषिकेश : हरिद्वार येथील कुंभमेळ्यात साधु संतांच्या प्रचंड गर्दीमुळे कोरोनाचा उद्रेक झाल्याचे दिसून आले आहे. 10 ते 14 एप्रिल दरम्यान कुंभमेळ्यात सतराशेपेक्षा अधिक जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. हा धार्मिक मेळावा कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे. आरोग्य कर्मचा-यांनी गेल्या पाच दिवसात 2,36,751 जणांच्या कोविड चाचण्या पुर्ण केल्या असून त्यापैकी 1701 जणांचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. कुंभमेळ्यात आलेल्या 48.51 लाख भाविकांनी मास्कचा वापर केला नसल्याचे व सामाजिक अंतर राखले नसल्याचे दिसून आले आहे. 14 एप्रिलच्या दिवशी शाही स्नानापुर्वी साधू आरटीपीसीआर तपासणीसाठी तयार झाले नव्हते.