जळगाव : सर्वोच्च न्यायालयात दाखल विशेष याचिकेतील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त असलेली 100% पदे कोणत्याही आरक्षणाचा विचार न करता केवळ तात्पुरत्या स्वरुपात सेवा जेष्ठतेनुसार भरण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार 16 एप्रिलपासून निव्वळ स्थानीक व तात्पुरत्या स्वरुपात अटी व शर्थीच्या अधीन राहून सध्याच्या नेमणूकीच्या ठिकाणी असलेल्या पोलिस हवालदार ते सहायक फौजदार अशी 94 जणांना पदोन्नती देण्यात आली आहे. याच स्वरुपातील अटी व शर्थीच्या अधीन राहून पोलिस नाईक पदावरील 57 जणांना पोलिस हवालदार पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. सर्व पदोन्नतीधारक पोलिस नाईक यांना 750 रुपये विशेष वेतन म्हणून लागू करण्याची देखील मंजुरी देण्यात आली आहे.