नाशिक : कोरोना विषाणूचा वाढता आलेख लक्षात घेता नाशिक येथील करन्सी सिक्युरीटी प्रेस आणि इंडीया सिक्युरिटी प्रेस या दोन्ही ठिकाणी होणारी चलनी नोटांची छपाई सध्या बंद करण्यात आली आहे. या दोन्ही ठिकाणी केवळ फायर ब्रिगेड, पाणीपुरवठा तसेच वैद्यकीय सुविधा या प्रकारातील कर्मचारी कामावर येत आहेत.
देशातील एकुण चलनापैकी चाळीस टक्के चलनी नोटांची या प्रेसमधे छपाई होत असते. या दोन्ही ठिकाणी सुमारे तिन हजार कर्मचारी कामावर आहेत. आरोग्याच्या दृष्टीने चलनी नोटांची छपाई 30 एप्रिल पर्यंत बंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षी कोरोना संक्रमनामुळे चाळीस कर्मचा-यांना बाधा झाली होती. चलनी नोटा हाताळणीतून कोरोना प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेत सदर खबरदारी त्यावेळी देखील घेण्यात आली होती.