अकोला जिल्ह्यात भुकंपाचा सौम्य धक्का

On: April 17, 2021 7:26 PM

अकोला : अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात आज शनीवार दि. 17 एप्रिल रोजी दुपारी 3.45 वाजता भुकंपाचा सौम्य धक्का बसला. 3 रिश्टर स्केलवर हा धक्का बसला असल्याची नोंद करण्यात आली आहे. अकोला शहरापासून पश्चिम दिशेला बाळापुर शहरानजवळ 19 कि.मी. अंतरावर या भुकंपाचे केंद्र असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे. 20.75 व 76.83 लॉंग व लॉंजीट्युड असा धक्का असल्याचे दाखवण्यात आले असून नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे देखील प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment