मुंबई : सर्वत्र कोरोनाचा कहर वाढत असतांना मुंबई शहरात अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिक घराबाहेर पडत असल्याचे दिसत आहेत. संचारबंदी दरम्यान केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनांना फिरण्याची परवानगी देण्यात आली आहे. वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी एक निर्णय घेतला आहे. मुंबईत फिरणाऱ्या वाहनांना आता कलर कोड दिला जाणार आहे. उद्यापासून मुंबईच्या रस्त्यावर लाल, हिरवा व पिवळा अशा तिन रंगाची स्टीकर असलेली वाहने दिसणार आहेत.
वैद्यकीय कर्मचा-यांच्या वाहनाला लाल रंग देण्यात आला आहे. भाजीपाला असलेल्या वाहनाला हिरवा रंग आणि इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना पिवळ्या रंगाचे स्टीकर दिले जाणार आहे. पोलीसांकडून याबाबत मार्गदर्शक सुचना दिल्या जाणार आहेत. तसेच लोकल मधील अत्यावश्यक सेवेतील प्रवासीवर्गाला देखील कलर कोड दिला जाणार आहे.