दिल्ली पोलिसांनी रोखली कार – महिलेने घातला वाद

On: April 19, 2021 12:20 PM

महाराष्ट्रासह राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, छत्तीसगड व मध्य प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून ही चिंतेची बाब आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन करणा-या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी देशातील पोलिस रस्त्यावर उतरले आहेत. मास्क वापरा, सोशल डिस्टन्स पाळा हे साधे साधे नियम वारंवार नागरिकांना सांगून देखील कित्येक लोक कोरोना नियमांचे उल्लंघन करत आहेत. राजधानी दिल्लीत विकेंड लॉकडाऊनच्या कालावधीत मास्क न वापरल्यामुळे एक दाम्पत्याची कार पोलिसांनी अडवली असता या दाम्पत्याने पोलिसांसोबत मोठ्या प्रमाणात हुज्जतबाजी केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. आपले वडील पोलिस अधिकारी असून पावती फाडून दाखवाच अशा शब्दात या महिलेने पोलिसांसोबत अरेरावी केली. बघा व्हिडीओ ….

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment