मोटार सायकल चोरटा एलसीबीच्या ताब्यात

On: April 20, 2021 10:09 AM

जळगाव : दोन वर्षापुर्वी चोरुन नेलेली मोटार सायकल नंबर प्लेटशिवाय वापरत असलेल्या आरोपीला तालुक्यातील कानळदा येथून जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली आहे. विरसिंग बारेला असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. जळगाव तालुका पोलिस स्टेशनला गु.र.न. 162/19 भा.द.वि. 379 नुसार सदर मोटार सायकल चोरीचा गुन्हा दाखल होता. अटकेतील विरसिंग बारेला याने सदर गुन्हा कबुल केला आहे.

विरसिंग बारेला (बोरगाव ता. पधाना जि. खंडवा मध्य प्रदेश) हा कानळदा येथे त्याच्या नातेवाईकांकडे चोरीच्या मोटारसायकलसह आला असल्याची गुप्त माहिती पो.नि. किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. पोलिस तपास पथकाने त्याचा माग काढत कानळदा येथून पळून जाण्याच्या बेतात असतांना त्याला चोरीच्या क्रॅक्स कंपनीच्या मोटारसायकलसह अटक करण्यात आली. या तपासकामी पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या पथकातील हे.कॉ. विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, पोलिस नाईक नितीन बाविस्कर, प्रितम पाटील, राहुल पाटील, चालक हे.कॉ. भारत पाटील यांनी तपासकामी सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment