जळगाव : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत बांधकामाचे बिल मंजुर करण्याकामी घेतलेली विस हजाराची लाच जळगाव जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ अभियंत्यासह वरिष्ठ सहायकास भोवली. अरुण जगन्नाथ चव्हाण (57), कनिष्ठ अभियंता, जिल्हा परीषद बांधकाम विभाग,उपविभाग अमळनेर रा.मराठा कॉलनी, अमळनेर जि.जळगाव तसेच योगेश बापू बोरसे (42) वरीष्ठ सहाय्यक, जिल्हा परीषद बांधकाम विभाग,उपविभाग अमळनेर रा.प्रताप मिल, कंपाऊंड, अमळनेर जि.जळगाव असे दोघा लाचखोरांचे नाव आहे.
बांधकामाचे बिल मंजुर करण्याकामी कनिष्ठ अभियंता अरुण चव्हाण यांनी 20 हजाराच्या लाचेची मागणी व स्विकार तसेच वरिष्ठ सहायक योगेश बोरसे यांनी 1500 रुपयांच्या लाचेची मागणी व स्विकार करतांना एसीबीच्या सापळ्यात जि.प.च्या अमळनेर येथील बांधकाम कार्यालयात रंगेहाथ पकडले गेले. या कारवाईत पोलिस उप अधिक्षक सुनिल कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. निलेश लोधी, सफौ.दिनेशसिंग पाटील, सफौ.सुरेश पाटील, पोहेकॉ.अशोक अहीरे, पोहेकॉ.सुनिल पाटील, पोहेकॉ.रविंद्र घुगे, पोना.मनोज जोशी, पोना.सुनिल शिरसाठ, पोना.जनार्धन चौधरी, पोकॉ.प्रविण पाटील, पोकॉ.नासिर देशमुख, पोकॉ.ईश्वर धनगर, पोकॉ.प्रदिप पोळ आदींनी सहभाग घेतला.